कणकवली : कणकवली येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गणेशमूर्तीचे पूजा मंडपात ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन होईल, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ पासून गणेश मूर्ती प्रतिष्ठापना व पूजा, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, दुपारी ३.३० वाजल्यापासून सुस्वर भजने होतील.
यामध्ये श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, जानवली, बुवा रवी राणे, मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ नागवे, बुवा अमेय आर्डेकर, राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ जानवली, बुवा उदय राणे, गांगेश्वर अनभवानी प्रासादिक भजन मंडळ डामरे, बुवा चिन्मय सावंत, आई जयंतीदेवी भजन मंडळ पळसंब, बुवा अनिल परब यांचा समावेश आहे. रात्री ८.३० वाजता महाआरती होईल, रात्री ९.३० वाजता ओमकार दशावतार नाट्य मंडळाचे ‘गंधर्व उद्धार’ नाटक होणार आहे. तर २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गणेश मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे.