0.2 C
New York
Tuesday, February 11, 2025

Buy now

मोठी बातमी.! कणकवलीतील लक्ष्मी लॉजच्या मॅनेजरला अखेर पोलिसांनी घेतले ताब्यात

लॉज मालक सुद्धा पोलिसांच्या रडारवर

कणकवली : कणकवली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेण्याच्या गुन्ह्यात कणकवली एसटी स्थानकासमोरील लक्ष्मी लॉज चा मॅनेजर ओंकार विजय भावे (वय ३२, रा. कळसुली) याला कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल हाडळ, हवालदार पांडुरंग पांढरे यांनी अटक केली. ही कारवाई जानवली ब्रिजनजीक सोमवारी रात्री करण्यात आली.

१५ जानेवारी रोजी कणकवलीत पकडण्यात आलेल्या दोन बांगलादेशी महिलांकडून लक्ष्मी लॉज येथे वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार २० जानेवारी रोजी कणकवली न्यायालयात वाढीव पोलिस कोठडीची मागणी करताना तपासी अधिकारी पीएसआय अनिल हाडळ यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध १९५६ चे कलम ५ (१) हे कलम लावले होते.

लक्ष्मी लॉज चा मॅनेजर ओंकार याच्या मागावर पोलीस होते. तो जानवली ब्रिजकडे येणार असल्याची माहिती मिळताच पीएसआय अनिल हाडळ, हवालदार पांडुरंग पांढरे यांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेत कणकवली पोलीस ठाण्यात आणून अटक केली. लक्ष्मी लॉज च्या मॅनेजर ला अटक केल्यानंतर आता लॉज मालक सुद्धा पोलिसांच्या रडारवर आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!