0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

सिंधुदुर्गाच्या पालकमंत्रीपदी नितेश राणे यांची नियुक्ती

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कणकवली मतदारसंघाला पालकमंत्री पद

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव

कणकवली : राज्य मंत्रिमंडळ विस्तारानंतर गेले अनेक दिवस प्रलंबित असलेला पालकमंत्री वाटपाचा तिढा अखेर आज सुटला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी अपेक्षेप्रमाणेच कणकवली मतदारसंघाचे आमदार व राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जल्लोषाचे वातावरण आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर कणकवली मतदारसंघाला पालकमंत्री पदाचा मान मिळाला असून येत्या काळात निश्चित सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला याचा फायदा होणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!