कणकवली: कलमठ-लांजेवाडी येथील गणेश कृपा मित्रमंडळातर्फे गणेश मंदिर येथे माघी गणेश जयंती उत्सव व मंडळाच्या सांस्कृतिक महोत्सवानिमित्त ३० जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वा. जिल्हास्तरीय खुली एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ६५००, ५ हजार, ३५०० रु. व उत्तेजनार्थसाठी एक हजार रु. तसेच प्रत्येकी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी सागर पाष्टे (९४२०७२६०१४), राहुल चव्हाण, महेश परब यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.