सावंतवाडी : मळगाव येथे उभ्या असलेल्या लक्झरी बसला वेगाने येणाऱ्या डंपर चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपर चालक गाडीतच अडकला तर त्या गाडीत लक्झरी बसचे काम करणारा बस चालक व अन्य एक सहकारी प्रवासी जखमी झाला आहे. ही घटना आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मळगाव ब्रीजवर झाराप-पत्रादेवी महामार्गावर घडली. दरम्यान त्या चालकासह अन्य जखमींना अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.