नरडवे शाळा नं १ मधील विद्यार्थी कु. सोहम गुरुनाथ कांदे आणि परेश भास्कर मुंडले यांनी प्रतिष्ठेच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला
कणकवली : नडगिवे येथे संपन्न झालेल्या कणकवली तालुका स्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात नरडवे न. 1 शाळेतील कुमार सोहम गुरुनाथ कांदे 4 थी आणि परेश भास्कर मुंडले 4 थी यांनी ज्ञानी मी होणार या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कणकवली तालुक्यामध्ये पहिला क्रमांक संपादित केला. या बद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. नरडवे सारख्या ग्रामीण भागात सातत्यपूर्ण कामगिरी करत ज्ञानी मी होणार स्पर्धेत यश संपादन केले. यापूर्वी 2019 मध्ये देखील नरडवे नं. 1 शाळेतील मुलांनी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक संपादित केला होता. त्यांची या यशाची पुनरावृत्ती करत पुन्हा या वर्षी देखील प्रथम क्रमांक मिळावीत इतिहासाची पुनरावृत्ती केली. यावर्षी जिल्हास्तरीय स्पर्धेत अशीच कमागिरी करण्याचा मानस असल्याचा विश्र्वास मार्गदर्शक मुख्याध्यापक श्री. समीर पाटील आणि श्री. सुशांत मर्गज यांनी व्यक्त केला. 1 ली पासूनच शाळेमध्ये विविध स्पर्धा परीक्षांचा सराव घेतला जातो. दरवर्षी विविध स्पर्धांमध्ये अनेक विध्यार्थी राज्य, जिल्हा स्तरावर मेरिट धारक होतात. शाळेच्या या सातत्यपूर्ण कामगिरी मुळे नरडवे न. 1 शाळेचे संपूर्ण तालुक्यामध्ये कौतुक होत आहे. या यशाचे कौतुक करण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. नरडवे न. 1शाळेने कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक मिळावील्यांबद्दल आज कार्यक्रमाचे अध्यक्ष मान. श्री. सुरेश ढवळ (माजी जि. प. सदस्य), मान. श्री. गणपत सावंत सरपंच, मान. श्री. वैभव नार्वेकर उपसरपंच, मान. श्री. अंकुश सावंत तंटामुक्ती अध्यक्ष नरडवे, माजी प्राचार्य मान. श्री. शंकर सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मान. श्री. गणेश सावंत, मान. सौ. अमिता सावंत माजी सरपंच, मान. श्री. प्रकाश शिंदे ग्रा.प. सदस्य, मान. सौ. कोमल मेस्त्री उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मान. श्री. महेश मेस्त्री माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, उपाध्यक्ष मान. सौ. गीतांजली कांदे आणि सर्व ग्रामस्थ पालक यांच्या वतीने विध्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शक शिक्षक श्री. समीर पाटील सर आणि श्री. सुशांत मर्गज सर यांचा सत्कार करण्यात आला.
या यशा बद्दल गटशिक्षणाधिकारी श्री. किशोर गवस, विस्तार अधिकारी श्री. कैलास राऊत, केंद्र प्रमुख श्री. विजय भोगले यांनी शाळेतील विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक केले आहे.