मालवण : येथील रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धेत पहिल्या गटात लावण्य गोसावी (कोळंब शाळा क्रमांक एक) तर दुसऱ्या गटात सानिका ठाकूर (न्यू इंग्लिश स्कूल माळगाव) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. येथील रोटरी क्लबच्या वतीने अपूर्व फर्नांडिस प्रायोजित तालुकास्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात आली स्पर्धेत तालुक्यातून ६५ मुले सहभागी झाली होती. रोटरी क्लबचे अध्यक्ष रमाकांत वाक्कर, अपूर्व फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे सचिव पंकज पेडणेकर डॉ. अजित लिमये, डॉ. लीना लिमये, असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर, उमेश सांगोडकर, सुहास ओरसकर, प्रवीण शिंदे, रंजन तांबे, रश्मी वाक्कर, गौरी पाटकर, श्वेता पेडणेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचा निकाल असा- गट इयत्ता पाचवी ते सातवी -द्वितीय- दुर्वा परब (न्यू इंग्लिश स्कूल माळगाव), तृतीय – गंधार तेंडोलकर (डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबाग), उत्तेजनार्थ प्रथम – गौरी केतकर (रोझरी इंग्लिश स्कूल मालवण), द्वितीय- सुकन्या लोके (वायरी भूतनाथ शाळा), गट इयत्ता आठवी ते दहावी – द्वितीय- सुधीर आरस (टोपीवाला शाळा मालवण), तृतीय – भूमी नाबर (न्यू इंग्लिश स्कूल आचरा) स्पर्धेत परीक्षक म्हणून विनायक कोळंबकर, गार्गी कुशे, रंजन तांबे यांनी काम पाहिले. ही स्पर्धा डॉ. लीना लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. सूत्रसंचालन गौरी पाटकर यांनी केले.