0.7 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

वणव्याच्या आगीत होरपळून वृद्धाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील हरकुळ येथील घटना

कणकवली : तालुक्यातील हरकुळ बुद्रुक ( जंगमवाडी – सामंतवाडी ) येथील श्रीकृष्ण वसंत प्रभू – पाटकर ( वय ७० ) यांचा मंगळवारी वणव्याच्या भडक्यात होरपळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत श्रीकृष्ण प्रभू पाटकर यांचा मुलगा सचिन प्रभू पाटकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. यात असे म्हटले आहे की, सचिन हे नेहमीप्रमाणे कणकवली येथे कामावर आले होते. मंगळवारी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास सचिन यांना त्यांची मामी सुनंदा सामंत यांचा फोन आला. त्यांनी सचिन यांना ताबडतोब घरी यायला सांगितले. त्यामुळे सचिन हे तातडीने घरी पोचले. यावेळी सचिन यांना घराच्या मागील बाजूस १०० मीटरवर लोक जमा झालेले दिसले. सचिन यानी तेथे जाऊन पाहिले असता तेथे त्यांचे वडील श्रीकृष्ण प्रभू – पाटकर हे होरपाळलेल्या अवस्थेत दिसून आले. यावेळी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचे उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

सचिन यांनी दिलेल्या खबरीनुसार कणकवली पोलीस ठाण्यात श्रीकृष्ण वसंत प्रभू – पाटकर यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!