1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

ड्रोनने पकडून दिल्या अवैध मासेमारी मासेमारी करणाऱ्या 3 बोटी

रत्नागिरीच्या समुद्रात ५ दिवसात ट्रॉलिंग, पर्सनेट बोटींवर कारवाई

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांचा क्रांतिकारी निर्णय

रत्नागिरी । प्रतिनिधी : सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून राज्याच्या सागरी किनाऱ्यावर सुरू करण्यात आलेल्या ड्रोन प्रणालीने क्रांती घडवण्यास सुरुवात केली आहे.
रत्नागिरीच्या समुद्र क्षेत्रात अवैध मासेमारी करणाऱ्या 3 नौकांवर ड्रोनमुळे कारवाई करण्यात आली आहे.

राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारीवर नियंत्रण, राष्ट्रीय सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याच्या जलधी क्षेत्रात ड्रोनव्दारे देखरेख ठेवून शाश्वत मासेमारी दृष्टीने मार्गक्रमण करण्यादृष्टीने ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे उड्डाण व आयुक्त मत्स्यव्यवसाय, मुंबई कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन दि. 09 जानेवारी रोजी सकाळी 10.00 मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांचे शुभहस्ते करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात साखरीनाटे, ता. राजापूर आणि भाट्ये, ता. रत्नागिरी या दोन ठिकाणी दि. 09/01/2025 पासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आले पासून आजतागायत एकूण 3 नौकांवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. त्यामध्ये 10 वावाच्या आत ट्रॉलिंग – पध्दतीने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या समीर अ. गफूर वस्ता यांची नौका “मोहम्मद सैफ” क्र. (IND-MH-4-MM-676 2) आणि श्रीम. जबीन कमाल होडेकर यांची नौका “अल कादरी” क्र. IND-MH-4-MM-1635 या 2 नौकांवर कारवाई करण्यात आली. तर इम्रान कुमारुद्दीन मुल्ला यांची नौका “यासीर अली- II” क्र. IND-MH-4-MM-5962 विनिर्दिष्ट क्षेत्रात – पर्ससिन जाळ्याने अनधिकृत मासेमारी केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. सदर 3 नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व (सुधारणा) अध्यादेश, 2021 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

सदर ड्रोन प्रणालीद्वारे सागरी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याने मच्छीमारांनी कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 व (सुधारणा) अध्यादेश, 2021 अंतर्गत कायद्यांतर्गत अटी शर्तीचा भंग करुन मासेमारी करु नये असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.), रत्नागिरी कार्यालयाकडून सूचित करणेत येत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!