जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन
कणकवली : बॅ. नाथ पै यांच्या जीवन चरित्राचे व कार्याचे परिशिलन उमलत्या वयातील विद्यार्थ्यांकडून व्हावे आणि त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी या हेतूने नगर वाचनालय कणकवली तर्फे बॅ. नाथ पै वक्तृत्व स्पर्धा सामाजिक कार्यकर्ते स्व. आनंद आळवे यांनी केलेल्या आर्थिक नियोजनातून दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता आप्पासाहेब पटवर्धन सभागृह, नगर वाचनालय कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेसाठी असलेले विषय पुढीलप्रमाणे – १) कोकण विकासासाठी बॅ. नाथ पै यांचे विचार प्रेरणादायी. २) मोबाईलला गुरु मानणारी युवा पिढी, असे दोन विषय स्पर्धेसाठी निवडण्यात आले असून या दोन विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर मराठी भाषेतून स्पर्धकाने आपले विचार मांडायचे आहेत. स्पर्धकांनी आपल्या विषयावर मांडणीचे टिपण स्पर्धेच्या दिवशी स्पर्धा सुरू होण्याआधी आयोजकांकडे सादर करायचे आहे.
स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ असे नंबर काढण्यात येणार असून प्रथम क्रमांकास रोख रक्कम १०००/- व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास रोख रक्कम ७००/- व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास रोख रक्कम ५००/- व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना रोख रक्कम १५०/- व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित आहे. ही स्पर्धा इयत्ता आठवी ते सध्या दहावीत शिकत असलेले विद्यार्थी – विद्यार्थिनिंसाठी विनाशुल्क आहे. तर यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे. सहभागी स्पर्धकांना कमीत कमी पाच मिनिटे व जास्तीत जास्त सात मिनिटांची अंतिम मर्यादा असणार आहे. विषय मांडणी, परिणामकारकता, आत्मविश्वास, उच्चारण आणि वेळेचे भान या पाच मुद्द्यांवर प्रत्येक स्पर्धकाचे मूल्यमापन केले जाणार आहे. प्रशालेतील फक्त दोन विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभाग घेण्यास मिळेल. सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग अर्ज दिनांक २० जानेवारी पर्यंत ग्रंथपाल नगर वाचनालय यांच्याकडे जमा करायचा आहे. अधिक माहितीसाठी ९०७५८७८९८७ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.