3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

कणकवली पर्यटन महोत्सवाला भव्य शोभायात्रेने प्रारंभ

शहरातून निघालेली शोभायात्रा ठरली लक्षवेधी ; नागरिकांनी केली रस्त्याच्या दुतर्फा गर्दी

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित शोभयात्रेत भारतीय संस्कृती, परंपरा यांचा अनोखा मिलाप दर्शविणारे चित्ररथ लक्षवेधी ठरले. त्या चित्ररथांना अनुरूप गाण्यांचा ठेका, सजवलेल्या विविध देखावे अशा भारलेल्या वातावरणात भव्य शोभायात्रेने गुरुवारी सायंकाळी कणकवली पर्यटन महोत्सवाचा शानदार शुभारंभ करण्यात आला.

कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटना पूर्वी शहरातून ढोल, ताशांच्या गजरात ही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत कार्टूनच्या वेशभूषा केलेले कलाकार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या शोभा यात्रेने कणकवली दूमदूमून गेली होती.

या शोभयात्रेचा शुभारंभ श्री पटकीदेवी मंदिराकडे करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संजय कामतेकर, विठ्ठल देसाई,सुशील पारकर,सिध्देश वालावलकर ,संदीप नलावडे,राजू गवाणकर, मनीष पेडणेकर,आशिष वालावलकर,राज नलावडे,भरत उबाळे,बंडू गांगण,किशोर राणे,अभय राणे,सुप्रिया नलावडे,कविता राणे ,संजीवनी पवार,अण्णा कोदे आदी उपस्थित होते. सिंधुगर्जना ढोल पथकाच्या साथीने श्री पटकीदेवी मंदिराकडून बाजारपेठ मार्गे अप्पासाहेब पटवर्धन चौकातून येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पर्यटन महोत्सवाच्या स्थळापर्यंत ही शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मंडळे, शाळा या शोभायात्रेत सहभागी झाली होती. त्यांनी आकर्षक चित्ररथ तयार केले होते. छत्रपती शिवाजी महाराज,श्रीराम यांचा जीवनप्रवास उलवडणारे चित्ररथ तयार करण्यात आले होते.

शहरातून निघालेले विविध प्रकारचे आकर्षक देखावे पहाण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. सिंधुगर्जना ढोलपथकाने शानदार ढोलवादन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!