मालवण शहराची रात्री केली पाहाणी
मालवण : आमदार निलेश राणे यांनी काल रात्री मालवण शहराचा स्पॉट पंचनामा करत मालवण शहराची पाहणी केली.यावेळी त्यांनी बंदर जेटीवरील बंद लाईट याबाबत तक्रारीची पाहाणी केली. तसेच तेथील बंद सुलभ शौचालय, दुर्गंधी याबाबत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. मच्छीमार्केट येथील सेल्फी पॉईंट ठिकाणी असलेली दुर्गंधी, अस्वच्छता याचीही पाहाणी केली. तसेच मालवण नगरपरिषद कर्मचारी वसाहत येथे नवी इमारत उभारणी रखडली आहे. याबाबत पाहाणी केली व माहिती जाणून घेतली. या सर्वांबद्दल प्रशासनाशी चर्चा करून योग्य त्या सूचना देणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.