3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

हरकुळ बुद्रुकमध्ये १० रोजी आकाशगंगेसह तारे दर्शन !

कणकवली : हरकुळ बुद्रुक समता सेवा संघ,मुंबई संचलित लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालय व अशोक मधुकर पावसकर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे अॅड, अशोक मधुकर सातवसे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.त्यातील तिसरे पुष्प नेहरु तारांगण वरळी, मुंबईचे वरिष्ठ प्राध्यापक खगोल शास्त्रज्ञ एस्. नटराजन हे गुंफणार आहेत.
त्यांचे व्याख्यान व प्रात्यक्षिक १० जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्रशालेच्या प्रांगणात आयोजित केले आहे.
पोलिस अधिकारी अनघा सातवसे व लक्ष्मीबाई गोपाळ सामंत विद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास पावसकर यांच्या संकल्पनेतून हरकुळ गावामधील विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे.

नेहरु तारांगण वरळी, मुंबईचे वरिष्ठ प्राध्यापक खगोल शास्त्रज्ञ एस्. नटराजन हे गेली ३० वर्षे ग्रामीण भागातील हायस्कूल, कॉलेज, मोठ्या हाऊसिंग सोसायटीत, पर्यटन स्थळी प्रत्यक्ष जाऊन हा उपक्रम विनामूल्य राबवत आहेत. विद्यार्थ्यांबरोबरच जनतेसाठी आकाशगंगेतील ग्रह, तारे, धुमकेतू इत्यादी माहिती सुरुवातीला कलर्स लाईटच्या माध्यमातून व नंतर टेलिस्कोप (दुर्बिण) च्या माध्यमातून आकाशगंगेतील ग्रह, तारे, धुमकेतू इत्यादी दाखविले जाणार आहेत. मुलांमध्ये खगोलशास्त्राची उत्सुकता व आवड निर्माण करण्यासाठी त्याचबरोबर समज, गैरसमज दुर करण्यासाठी मोफत उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा विद्यार्थी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे मुख्याध्यापक सतिश नेवाळकर व डॉ. सुहास पावसकर यांनी आवाहन केले आहे.

या उपक्रमाबद्दल अधिक माहिती व कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सुहास पावसकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!