कणकवली : आंब्रड भगवती देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव ७ जानेवारी मंगळवार रोजी विविध धार्मिक कार्यक्रमासह मोठ्या ऐश्वर्यात संपन्न होणार आहे, नवसाला पावणाऱ्या या भवानीच्या गोंधळ उत्सवाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानं च्या वतीने केलें आहे .तळ कोकणातील काही प्रसिद्ध असलेल्या देवस्थानं पैकी श्री भगवती देवी देवस्थान आंब्रड हे ऐक धार्मिक पवित्र देवस्थानं असून प्रती वर्षी पौष महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी आई भगवती देवीचा गोंधळ उत्सव मोठ्या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमासह संपन्न केला जातो.सोमवार पहिला दिवस सर्व देव तरंगाची महावस्त्र, मोहरे सह वाद्य मिवणुकीने मंदिरामध्ये आणली जातात, रात्रौ उशिरा पर्यंत ही महावस्त्र, मोहरे विधिवत देव देवतांना, तरंगाणा परिधान केली जातात, मंगळवारी सकाळी विनापुजन करुन गोंधळ उत्सवाला प्रारंभ केला जातो, संध्याकाळी देवीला नेवैद्य अर्पण करुन महाप्रसादाला सुरवात होते. रात्री उशिरा पर्यंत महाप्रसदा सुरू असतो पंधरा ते वीस हजार भाविक या महो्सवासात सहभागी होतात.
रात्रौ बारा वाजता दिवट्या प्रज्वलित करून पालखी प्रदक्षणेला प्रारंभ होतो, देवी भगवती देवी च्या मंदिरा मधून सवाद्य पालखी देव रवळनाथ मंदिरा मद्ये जाते व तिथून सर्व देव पंचायतना ला पाच प्रदक्षणा पुर्ण करतात. प्रदक्षना पुर्ण झाल्यावर पालखी पुन्हा देवीच्या सभागृहात विसावते जिथे गोंधळाचा मांड प्रस्तापित केलेला असतो. भाविक भक्त, सुहासिनी दिवटी पूजन करून तेल अर्पण करतात . प्रा. हरिभाऊ भीसे यांच्या कुटुंबीयाकडे पारंपरिक गोंधळ विडा असून ते विविध कलाकरा सह गोंधळ नृत्य, गायन, पौराणिक कथा सादर करतात, पहाटे भवानी चा संचार होतो पुन्हा दिवट्या प्रज्वलित, प्रदक्षणा, आरती होतें. संपूर्ण कोकण, कोल्हापूर, बेळगाव, कर्नाटक येतून विविध व्यावसायिक दुकाने, मनोरंजना चे खेळ, खाद्य स्टॉल, सवांसर पयोगी साहित्य, हॉटेल्सनी सर्व परिसर व्यापलेला असतो, दिवसेंदिवस भाविक भक्ताची, पर्यटकांची वाढत्या गर्दीमुळे मंदीर परिसर कमी पडू लागला आहे. श्री भगवती देवी सह सर्व मंदिरे ही फार पुरातन मंदिरे असून सर्व मंदीरे जीर्णोद्धार करण्याचा संकल्प देवस्थानच्या वतीने करण्यात आला आहे.
सोमवार, मंगळवार, बुधवार सतत तीन दिवस, धार्मिक कार्यक्रमां च्या वेळा सोडून ओट्या भरणे, नवस फेडणे, नवस बोलणे या साठी भाविकांची प्रचंड गर्दी असते, देवालया ना केलेली, फुलांची सजावट,नेत्रदीपक विद्युत रोषणाई, सनई चौघडा, ढोल ताशा, फटाक्यांची आतषबाजी भाविकांचे लक्ष वेधून घेत असते.
नोकरी, व्यवसाय, उद्योगासाठी देशा प्रदेशात गेलेले सर्व आंब्रड वासी, माहेर वासिनी आवरजून या गोंधळ उत्सवाला हजेरी लावून आई भगवती मातेचा आशीर्वाद घेतात. गुरुवार चौथ्या दिवशी समराधना होतें संध्याकाळी देव पालखी तरंग पुन्हा सवाद्य बाहेर निघतात भाविकांची गाऱ्हानी, पडस्थळे, ऐकून देव विश्रांतीला जातात. अशा या तिर्तक्षेत्र असलेल्या, नवसाला पावणाऱ्या आई भवानी, भगवती मातेच्या गोंधळ उत्सवाला विविध क्षेत्रातील मान्यवर भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतात आपण ही सर्व भाविकांनी ७ जानेवारी रोजी संपन्न होणाऱ्या या गोंधळ उत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.