-0.8 C
New York
Tuesday, January 14, 2025

Buy now

ब्लड कॅन्सर ने त्रस्त काव्याच्या उपचारासाठी अनेक मदतीचे हात पुढे सरसावले

आचरा महावितरणच्या माध्यमातून काव्या शेळके हिला मदत

आचरा : मालवण तालुक्यातील आचरा येथील परिस्थितीने गरीब, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चंद्रशेखर बाबुराव शेळके यांच्या अवघ्या तीन वर्षांची मुलगी काव्या चंद्रशेखर शेळके हिला ब्लड कॅन्सर या आजाराचे निदान झाल्याने तिच्यावर बांबूळी गोवा येथे उपचार केले जात आहेत. यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत आचरा महावितरण चे सहाय्यक अभियंता अनिल मटकर सहाय्यक लेखापाल. प्रसाद मयेकर कर्मचारी समीर धुरी, संदिप पांगम, रमेश राठोड, राजा बिरमोळे , सूरज बिरमोळे, भारती गोसावी, शुभदा भाट यांनी पुढाकार घेत रोख रक्कम स्वरूपाची आर्थिक मदत सोमवारी तीचे आजोबा यांच्या कडे सुपूर्द केली.त्यांच्या या सहकार्या बद्दल शेळके कुटुंबाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!