कणकवली : शहरातील रहिवासी, सेवानिवृत्त शिक्षक रमेश नारायण उबाळे (८४) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. उबाळे मेडिकल अँड जनरल स्टोअर्सचे मालक दयानंद उर्फ नंदू उबाळे, उबाळे एजन्सिजचे मालक राजू उबाळे व छत्रपती संभाजीनगर येथील न्यायाधीश अतुल उबाळे यांचे ते वडील होत. मंगळवारी सकाळी १० वाजता कणकवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.