कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ
देवगड : देवगड पंचायत समितीतील सिलिंग अचानक कोसळल्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली या घटनेत कोणाला दुखापत झाली असती तर प्रशासनाने जबाबदारी घेतली असती का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. सदरची घटना गुरुवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडली. उपलब्ध माहितीनुसार देवगड पंचायत समितीचे कौलारू इमारतीवरील अंतर्गत शुशोभीकरणाचे काम काही वर्षापूर्वी करण्यात आले होते . यावेळी इमारतीच्या छताला पूर्णतः सिलिंगचे काम करण्यात आले होते. मात्र गुरुवारी अचानक यातील सिलिंगचा भाग कोसळला . हा कोसळलेला सीलिंग भाग आता मांजराने उडी मारल्यामुळे छताचा काही भाग पूर्णता खाली कोसळला असल्याचे आता बोलले जात आहे.मात्र प्रश्न उपस्थित होतो तो आता या निकृष्ट कामाला जबाबदार कोण ?