खाऊगल्ली कार्यक्रमाला उत्स्फूर्त गर्दी
कणकवली : कणकवलीतील बच्चे कंपनीसाठी रविवारची सायंकाळ यादगार ठरली. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या संकल्पनेतून समीर नलावडे मित्रमंडळाच्यावतीने गणपती सान्यावर ‘एक दिवस छोट्यांचा’ अर्थातच खाऊ गल्ली या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन थोड्याच वेळात आमदार नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे.
विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, विविध खेळ – खेळणी, मिकी माऊस, कार्टून्स, जादूचे प्रयोग सोबत संगीत किलबिल जल्लोष या साऱ्याचा मनमुराद आनंद लुटत लहान मुलांनी अक्षरशः धम्माल केली.