सुषमा अंधारे यांचा राणेंना खोचक टोला
निलेश राणेंनी बाळासाहेबांवर केलेले आरोप शिंदेंना मान्य आहेत का..?
कणकवली : जर राणेंना तिसरा मुलगा असता तर तो निश्चितपणे सावंतवाडी मतदारसंघातून लढला असता. त्यामुळे महाविकास आघाडीची लढाई ही राणेंच्या घराणेशाही विरोधात आहे. यात तिन्ही मतदारसंघात आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास शिवसेना ठाकरे पक्ष नेत्या सुषमा अंधारे यांनी आज व्यक्त केला. तसेच आनंद दिघेंच्या हत्येप्रकरणी निलेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. ते आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य आहेत का? असा सवाल अंधारे यांनी आज व्यक्त केला. कणकवली येथील विजय भवन येथे सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासोबत येथील कुडाळ मतदार संघाचे उमेदवार वैभव नाईक, शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत, माजी आमदार परशूराम उपरकर उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या की, सिंधुदुर्गातील लढाई ही घराणेशाहीच्या विरोधात आहे. तसेच छत्रपतींचा पुतळा भ्रष्टाचार करून पाडणाऱ्यांच्या विरोधात आहे. या लढाईत सिंधुदुर्गातील जनता निश्चितपणे महाविकास आघाडीच्या बाजूने उभी राहणार आहे. राणेंना सिंधुदुर्गाचा विकास करायचा नाही तर आपल्या मुलांचे भवितव्य घडावे यासाठीच अट्टाहास सुरू आहे. त्यामुळे एका मुलाला कणकवलीतून तर द्ुसऱ्याला कुडाळ मधून उमेदवारी दिली आहे. जर राणेंना तिसरा मुलगा असता तर त्याला सावंतवाडी मतदारसंघातूनही तिकीट दिले असते. अंधारे म्हणाल्या, धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर एका पाठोपाठ एक असे चित्रपट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काढत आहेत. पण याच आनंद दिघे यांच्या हत्या प्रकरणावर निलेश राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जाहीरपणे आरोप केले होते. ही चिखलफेक एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का? तसे असल्यास त्यांनी कुडाळ येथील जाहीर सभेत त्याबाबत भाष्य करावे. तर नारायण राणे यांनी शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही असे वक्तव्य केले होते. त्याच राणेंना आता शिवसेनेचा प्रचार करावा लागतोय. धनुष्यबाण घेऊन फिरावे लागत आहे. आजवर राणेंनी मंत्री, मुख्यमंत्री ते केंद्रातील उद्योगमंत्री पदापर्यंत काम केले. एवढी पदे भूषवून देखील राणेंना विकासाच्या मुद्दयावर मते मागावी लागतात. परंतु सिंधुदुर्गातील जनतेला तुम्ही मूर्ख समजू नका. इथली जनता तुम्हाला मतपेटीतून चोख उत्तर देणार आह