8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

दोन बस मध्ये सापडल्याने महिलेचा मृत्यू | कणकवली बस स्थानकावर घडली घटना

कणकवली : कणकवली बसस्थानकावर फलाटावर लागणारी व फलाटावरून सुटणारी अशा दोन एसटी बस गाड्या परस्परांना धडकल्या. दुर्दैवाने बस पकडण्याच्या घाईत असलेली ३० वर्षीय महिला या दोन्ही बसच्यामध्ये सापडली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

घटनेनंतर तात्काळ १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेला कॉल करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्या महिलेच्या नाकातून रक्तस्त्राव होत होता. तपासणी अंती तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस व एसटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!