3.2 C
New York
Friday, January 17, 2025

Buy now

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच मानस पुत्र

बाळासाहेब ठाकरे यांची विचारधरा,त्यांच्या देश हिताच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम केले

उध्दव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट हे पद पुसून मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार काँग्रेसच्या पायदळी तुडवले

उबाठा मध्ये हिम्मत असेल तर महाविकास आघाडीच्या अजेंडात स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा विषय घेवून दाखवावा

कणकवली : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांना हेच मानस पुत्र आहेत. होय मी त्यांना मानस पुत्र मानतो. कारण रक्ताच्या मुलगा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची बेइमानी केली. गद्दारी केली. स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी आज बाळासाहेबांचे हिंदुहृदयसम्राट हे पद पुसून टाकले. आजही हे नाव पुढे लावण्याची हिम्मत उद्धव ठाकरे दाखवत नाही. बाळासाहेबांचा प्रत्येक विचार हा काँग्रेसच्या पायदळी तुडवला त्याच्यापेक्षा मोठा बेईमान आणि गद्दार दुसरा कोणी हा होऊ शकत नाही.आज खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी जी , अमित भाई शहा यांनी
बाळासाहेबांच्या विचारांना देशात पुढे घेऊन जाण्याचे काम केले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम ज्या नरेंद्र मोदी अमित शहा यांनी केले आहे.आणि म्हणूनच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा खरा अधिकार या दोघांना आहे. उद्धव ठाकरे यांना नाही. संजय राजाराम राऊतला तर मुळीच नाही. अशी घनाघाती टीका भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यापूर्वी संजय राऊत यांनी नवीन बॉस राहुल गांधी विचारून घ्यावे. उद्या राहुल गांधींनी डोळे वटारले तर स्टेजवर तुझ्या उद्धव ठाकरे ला खुर्ची पण भेटणार नाही. सावरकरांना भारतरत्न ही मागणी करण्या अगोदर पहिला राहुल गांधी कडे जा. हिम्मत असेल तर राहुल गांधीला पहिली वीर सावरकरांची माफी मागायला सांगा. त्यांच्या मुखातून महाविकास आघाडीची अधिकृत किंबहुना महाविकास आघाडीचे अधिकृत जाहीरनाम्यामध्ये ही मागणी वीर सावरकरांना भारतरत्न देणार किंवा मागणी करणार त्याचा पाठपुरावा करणार असा विषय महाविकास आघाडीच्या जाहीरनामा मध्ये छापण्याची हिंमत या उबाठा सेनेने करू दाखवावी.आणि मगच संजय राजाराम राऊत ने छाती फुगून दाखवावी असे नितेश राणे म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!