24.5 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

सातरल गावचे जेष्ठ नागरिक व माजी पोलिस पाटील लक्ष्मण राणे यांचे निधन

कणकवली : तालुक्यातील सातरल गावचे जेष्ठ नागरिक व माजी पोलिस पाटील लक्ष्मण सदाशिव राणे (फौजदार) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

गावातील जाणते फौजदार म्हणून त्यांची विशेष ओळख होती. सातरल गावच्या पोलिस पाटील पदाची ४० वर्षे त्यांनी उत्तमरीत्या धुरा सांभाळून सामाजिक सलोखा अबाधित ठेऊन आपली एक प्रतिष्ठा निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने गावातील एक जूने व जाणकार व्यक्तिमत्व हरपल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सद्याचे पोलिस पाटील नंदकुमार राणे यांचे ते वडील होत. तसेच सामाजिक कार्यकर्ते, ग्रा. सदस्य व भाजप युवा मोर्चा कणकवली तालुका उपाध्यक्ष सदाशिव राणे यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात मुलगे, मुली, सूना, पुतण्या, नातवंडे असा एकत्रित परिवार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!