30.4 C
New York
Thursday, June 19, 2025

Buy now

हेत येथील उबाठाच्या दोन माजी शाखाप्रमुखांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

आमदार नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत

वैभववाडी : हेत येथील उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख मनोहर बाबाजी फोंडके, माजी शाखाप्रमुख रवींद्र सदाशिव फोंडके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश उबाठा गटाला धक्का मानला जात आहे. आमदार नितेश राणे यांनी प्रवेश करणाऱ्या सर्वांचे पक्षात स्वागत केले.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये सुरेश पांडुरंग आमकर, प्रकाश गणपत फोंडके, अरुण धोंडू फोंडके, भानुदास मधुकर बुराण यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. वैभववाडी भाजपा कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, नासीर काझी, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भालचंद्र साठे, मनोहर फोंडके, हेत माजी सरपंच किशोर कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!