8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालायचे उद्घाटन

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या संपर्क कार्यालयाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी आमदार परशुराम उपरकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर, युवासेना उपतालुकप्रमुख प्रमुख उत्तम लोके, सुदाम तेली, राजू राठोड, सचिन सावंत, महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, सी. आर. आदि उपस्थित होते.

यावेळी कार्यलयात संदेश पारकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कणकवली विधानसभा मतदार संघात अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन अर्ज मागे घेतले. याबद्दल विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संदेश पारकर यांनी आभार मानले. याचे सर्व श्रेय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांना जात असल्याचे सांगितले.

यावेळी ते कणकवली येथील संपर्क कार्यालयच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले प्रकाश नारकर व विश्वनाथ कदम म्हणाले की, आपण महाविकास आघाडीच्या बाजूने राहील पाहिजे. संदेश पारकर आणि आम्ही यापूर्वी एकत्र काम करत होतो. त्यामुळे मतांच विभाजन होऊ नये यासाठी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. २३ तारीखला मतपेटीच्या माध्यमातून या मतदारसंघात कशा प्रकारे या मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि याचे रूपांतर विजयात होईल. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे संदेश पारकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!