12.8 C
New York
Monday, May 20, 2024

Buy now

दीड शहाण्या माणसांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवू नये – आ. नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका

उद्धव ठाकरे, संजय राऊत व आदित्य हे दीड शहाणे

प्रकाश आंबेडकर,नाना पटोले यांनी या सर्वांची लायकी दाखविली आहे

राऊत यांची प्रधानमंत्री मोदी साहेबांवर बोलण्याची लायकी नाही

कणकवली | मयुर ठाकूर : उबाठा चे दीड शहाणे उद्धव ठाकरे, संजय राजाराम राऊत आणि अर्धा तो आदित्य पेंग्विन. या उबाठा च्या दीड शहाण्यांनी दुसऱ्यांना शहाणपणा शिकवू नये. ज्यांच्या शहाणपणामुळे एक एक जण ठाकरेंचा पक्ष सोडत चाललेला आहे. संजय राऊत यांचे शहाणपण काय आहे ते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.असे हे दीड शहाणे नाना पटोले यांना नौटंकीबाज म्हणतात. आज उबाठा सेना सोडणारे संजय राऊत ला शिव्या घालत आहेत. म्हणून स्वतः दीड शहाण्या माणसांनी दुसऱ्यांना शहाणपण शिकवू नये.
असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला.
आज सकाळी भांडुप मध्ये बसून शहाणपण शिकवायला बघत होताउबाठा चा दीड शहाणा म्हणजे एक उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि तो अर्धा असलेला पेंग्विन म्हणजे दीड. आणि हा भांडुप मध्ये बसून देशाचे यशस्वी पंतप्रधान आणि विश्वगुरू ज्यांनी आज जगामध्ये भारताला एक वेगळा मान मिळवून दिलेला आहे. जगातला असा कुठलाही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती नाही जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत नाही. आणि अशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा उबाठाचा दीड शहाणा बसून शहाणपण शिकवत होता. म्हणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्धव ठाकरे यांची भीती वाटते ज्या उद्धव ठाकरे यांना मानेवरची मच्छर मारण्यापासून विचार करावा लागतो. मानेवरचा मच्छर कसा मारायचा याची त्यांना भीती वाटते. ज्या उद्धव ठाकरेनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये एक एनसी साधी स्वतःवर करून घेतलेली नाहीये. त्यांना घाबरणार कोण देशाचे पंतप्रधान ज्यांना आज पाकिस्तान घाबरतो. ज्यांना आज चीन घाबरत आहे. ज्यांना मोठ्यातला मोठा अतिरेकी आज भारताकडे वाकड्या नजरेने का पाहत नाहीत? कारण त्यांना माहिती आहे. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू नवीन वर्षाच्या निमित्ताने ही लढाई धर्म आणि अधर्म च्या मध्ये आहे खंडणीखोर आणि इडि व सीबीआयच्या माध्यमातून करणारा खंडणीखोर विरुद्ध उद्धव ठाकरेची आहे. ज्याला स्वतःला हिंदू बोलण्यामध्ये दोन वेळा विचार करतात. ज्याला हिंदू म्हणजे काय ? आणि हिंदुत्व म्हणजे काय ? हे काँग्रेसच्या व्यासपीठावर आणि राहुल गांधी यांच्या व्यासपीठावर बोलण्यावरून ज्याची हातभर फाटते. तो म्हणे धर्म आणि अधर्माच्या लढाई लढतोय उद्धव ठाकरे. आज हिंदू धर्माला मान मिळवून देणारे. आदरणीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला खऱ्या अर्थाने ताकद देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू धर्माबद्दलचा मान यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे कोण आहे. तर त्याच धर्मांतर झालेला उद्धव ठाकरे आणी त्याचा कामगार. उद्धव ठाकरे अर्जुन आहे. श्रीकृष्ण आहे. ज्या भांडुप मध्ये बसून जो शकुनी मामा रोज त्या उद्धव ठाकरेची उबाठा सेना हळूहळू संपवत चाललेला आहे. ना काँग्रेस वाले त्याला जवळ घेत ना शरद पवार गटातले त्याला जवळ घेत. आज उबाठा शिवसेना सोडणारा प्रत्येक नेता मग बबनराव घोलप असतील किंवा कुठल्याही नेत्याच्या समोर या की प्रत्येक जण संजय राजाराम राऊतला शिव्या घालतात आणि हा आम्हाला खंडणीखोर आणि ही नाव ठेवत आहे. ज्याच्या पूर्ण कुटुंबाच खिचडी चोरी मध्ये नाव आलेल आहे. गरीब कामगारांची खिचडी चोरून हा इथे याच आयुष्य जगतात यांचं घर चालवतात. त्यांनी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना खंडणीखोर नाव देन ही फार मोठी हास्यास्पद बाब आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांचे पूर्ण आयुष्य खंडणी घेऊन म्हणजे ते जय भवानी जय शिवाजी आणि टाक खंडणी म्हणजे उद्धव ठाकरे. आणि त्यांनी दुसऱ्यांना खंडणीखोर बोलन हा फार मोठा विनोद आहे.

संजय निरुपम ची पत्रकार परिषद झाली. म्हणजे आम्ही सर्वजण मग आमचे किरीट सोमय्या असतील. आम्ही सगळेजण आता जे सत्य महाराष्ट्राला सांगत आहोत. त्यावर शिक्कामोर्तब संजय राऊत च्या एक सहकाऱ्याने केलेला आहे. ज्यांनी या संजय निरुपम ला समानवरून हाकलून लावलं षडयंत्र करून. त्याच संजय निरुपम नी पत्रकार परिषदेत बुरखा फडलेला आहे. जो माणूस खिचडी चोरीवर आयुष्य जगतो. ज्याच्या मुलींच्या नावाने खिचडी चोरीचे पैसे पैसे गेलेले आहेत. तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलतो हा फार मोठा जोक आहे.

राहुल गांधींचा इतिहास बघा. जिथे जिथे आतापर्यंत राहुल गांधी यांनी २०१४ ते २०१९ पर्यंत प्रचार केला. ते सगळेच्या सगळे काँग्रेस चे उमेदवार पडलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ ते २०१९ तुमच्याच खासदारांचा प्रचार केला म्हणून तुझ्या मालकाचे १८ आले. म्हणून मिठाला थोडे जागा. नाहीतर तुमच्याऐवढे नमकहराम कोणीच नसणार.

राज ठाकरेंनी काय करावं आणि राज ठाकरे यांना यांच्यापेक्षा निश्चित पद्धतीने थोडं जास्त राजकारण कळत. आणि हिंदुत्वाचे महत्त्व या तीन पट लोकांपेक्षा थोडं जास्त कळत. त्यामुळे राज ठाकरे जी काय भूमिका घेतील ती हिंदुत्वाच्या हिताचीच असेल. आणि जे काय देवेंद्र फडणवीस म्हणाले ते देखील हिंदुत्वाच्या हिताच आहे. हिंदुत्व मजबूत होण्यावेळी यांच्यासारख्या धर्मांतर झालेल्या जिहाद्यांनी तोंड उघडू नये, असा इशारा आमदार नितेश आणि यांनी दिला आहे.

संजय राजाराम राऊत हे पुढच्या राज्यसभेमध्ये तरी असणार काय? की त्या अगोदर शिंदे गटामध्ये प्रवेश करणार. स्वतःची खासदारकी वाचविण्यासाठी लोकसभेनंतर संजय राजाराम राऊत हे कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिसतील. आणि मग कळेल की हा कसल्या चरित्राचा माणूस आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!