-0.2 C
New York
Saturday, February 15, 2025

Buy now

ट्रान्सफार्मर शिफ्ट करून ट्रायल टेस्ट घेत असताना ट्रान्सफार्मर चा स्फोट

परिसरातील ग्रामस्थांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून लाखोंचे नुकसान

कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली रेल्वे स्टेशन च्यानूतनीकरण कामादरम्यान रस्त्यात असलेला ट्रान्सफार्मर शिफ्ट करून ट्रायल टेस्ट घेत असताना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ट्रान्सफार्मर चा स्फोट झाला. त्याचा फटका रेल्वे स्टेशन परिसरातील विजग्राहकाना बसून घरगुती वापरातील फ्रीज, टीव्ही, इस्त्री, मिक्सर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. या घटनेनंतर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक संजय कामतेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विजवीतरण च्या अभियंत्यांना धारेवर धरले. तात्काळ नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या नुकसानी चे पंचनामे करण्यात सांगत त्यांना नुकसानभरपाई देण्याची आक्रमक होत मागणी केली.

त्यांनंतर वीज वितरण च्या अभियंत्यांनी नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या घरी जात नुकसानी चे व्हिडीओ शूटिंग घेत पंचनामे करून नुकसान भरपाई चा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवत असल्याचे सांगितले. रस्त्यात असलेला ट्रान्सफर्मर शिफ्ट केल्यानंतर नवीन ट्रान्सफार्मर बसवताना आवश्यक व्होल्टेज आणि तत्सम काळजी घेणे ट्रायल पूर्वी घेणे गरजेचे असते. मात्र केवळ ट्रान्सफार्मर बसविणाऱ्या ठेकदारावर विसंबून विजवितरण अभियंत्यांनी केलेल्या हलगर्जीपणा चा नाहक फटका ग्रामस्थांना बसला. ट्रान्सफार्मर ट्रायल घेण्यापूर्वी आवश्यक खबरदारी जबाबदार विजवीतरण अभियंत्यांनी घेतली नाही आणि त्यामुळेच परिसरातील ग्रामस्थांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून लाखोंचे नुकसान झाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!