-10.2 C
New York
Tuesday, January 21, 2025

Buy now

भिरवंडे बौद्धवाडी येथील युवक महिला व ग्रामस्थांचा भाजपात पक्षप्रवेश

भाजपा नाटळ- सांगवे विभागीय कार्यालयात संदेश सावंत केले भाजपात स्वागत

कणकवली : कणकवली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आ. नितेश राणे आणि माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत यांच्या विकास कामांच्या कार्याने प्रेरित होऊन भिरवंडे बौद्धवाडी येथील युवक, महिला व ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टी या पक्षात प्रवेश केला. कनेडी बाजारपेठ येथील भाजपच्या नाटळ सांगवे विभागीय कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला, असून प्रवेशकर्त्यांचे संदेश सावंत यांनी स्वागत केले.

यावेळी प्रशांत कांबळे, मुकुंद कांबळे, स्वप्नील जाधव, राजू जाधव, विनायक कांबळे, सुशील कांबळे, स्वप्ना कांबळे, शोभना पवार, शौर्या जाधव, प्राची कांबळे, स्नेहा पवार, लक्ष्मीकांत कांबळे आदी ग्रामस्थांनी भाजप मध्ये प्रवेश केला.

कनेडी दशक्रोशीतील बौद्धवाडीमध्ये आम. नितेश राणे व संदेश सावंत यांनी केलेली विकासकामे पाहुण आम्ही हा पक्ष प्रवेश केला असल्याचे प्रवेशकर्त्या ग्रामस्थांनी सांगितले. प्रवेशकर्त्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे संदेश सावंत यांनी सांगितले.

यावेळी सांगवे सरपंच संजय उर्फ बाबु सावंत,भरत गावकर भिरवंडे शक्ती केंद्र प्रमुख श्रीकांत सावंत, भिरवंडे सोसायटी माजी चेअरमन संतोष सावंत गांधीनगर सरपंच मंगेश बोभाटे, मिलिंद बोभाटे आदी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!