1.6 C
New York
Wednesday, February 12, 2025

Buy now

संजय आग्रे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले नियुक्तीपत्र

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली असून दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आग्रे याना शिवसेना उपनेतेपदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार रवींद्र फाटक, नूतन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख बापू धुरी आदी उपस्थित होते. संजय आग्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ देत शिवसेना पक्षनेतृत्वाची धुरा जिल्हाप्रमुख या नात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सांभाळली होती. मागील 2 वर्षांत कणकवली देवगड वैभववाडी कुडाळ मालवण या पाच तालुका क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी काम करताना पक्षनेतृत्वाच्या आदेशानुसार पक्षसंघटनावाढीसाठी अथक मेहनत घेतली होती. शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून अत्यंत सक्रीयपणे प्रसंगी पदरमोड करून पक्षसंघटनेसाठी काम केले होते. आग्रे यांच्या पक्षसंघटनेसाठी केलेल्या याच कामाची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव संजय मोरे यांनी संजय आग्रे यांची शिवसेना उपनेते पदी नियुक्ती करत असल्याचे नियुक्तीपत्र दिले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!