8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

भाजपला धक्का | कार्यकर्त्यांनी घेतली हाती मशाल

घराणेशाही मान्य नाही – संतोष गावडे

मालवण : विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये उमेदवारी वरुन सिंधुदुर्ग मध्ये घराणेशाही चालू आहे. रत्नागिरी – सिंधुदुर्गचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी आपले पुत्र नितेश राणे यांना कणकवली विधानसभेमधुन उमेदवारी दिली आहे. तर दुसरे पुत्र निलेश राणे यांना महायुतीमधुन कुडाळ विधानसभेची उमेदवारी दिली आहे. यामुळे भाजप – शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. मालवण तालुक्यातील गावराई मधील भाजपचे प्रमुख कार्यकर्ते संतोष गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. अमरसेन सावंत यांनी शिवबंधन बांधून त्यांच पक्षात स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना संतोष गावडे म्हणाले की, महायुतीमध्ये नारायण राणे विद्यमान खासदार असुन देखील महायुतीने नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना कुडाळ मधुन उमेदवारी तर दुसरे पुत्र नितेश राणे यांना कणकवली मधुन विधानसभा उमेदवार दिली आहे ही घराणेशाही आपल्याला मान्य नसुन अशाने सामान्य कार्यकर्ता कधीच वर येणार नाही. ही घराणेशाही आपल्याला मान्य नसल्यामुळेच आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत असल्याचे सांगितले.

यावेळी संतोष गावडे, सचिन जंगले, ईशा सामंत, प्रमोद घाडी, प्रणिता घाडी, रसिका घाडी, अक्षय गावडे दत्तात्रय गावडे, अनिल गावडे, दशरथ गावडे, तेजश्री गाडी, मानसी गावडे, मीनल गावडे, सुप्रिया गावडे, सुप्रिया गावडे, सतीश गावडे, शोभना गावडे, वृंदा गावडे, शिवानी गावडे, प्रेमलता गावडे, जयवंत गावडे, हरिश्चंद्र परब, सानिका जंगले, गजानन बावस्कर, दीपक गावडे, वैशाली आंगणे सदाशिव शिरोडकर, नामदेव शिरोडकर, संगीता शिरोडकर, हेमंत गावडे, सर्वेश गावडे, मंगेश गावडे, मंदार गावडे, उत्तम गावडे, शिवाजी गावडे, शिवराय गावडे, सुहास गावडे, प्रकाश गावडे, विष्णू गावडे, तुकाराम गावडे, चांगु फाले भक्ती परब या भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, सचिन कदम, कांता तेली अवधूत मालंडकर, महेश पारकर विभाग प्रमुख नागेश ओरोसकर, उपविभाग प्रमुख हरी वायंगणकर, गावराई शाखाप्रमुख बाबू केळुसकर, कृष्णा गावडे, युवासेना उपविभागप्रमुख, साई वालावलकर, युवासेना तालुका समन्वयक योगेश तावडे, देवरत वारंग, महिला विभाग प्रमुख म्हसकर मॅडम, अरविंद वालावलकर, विजय आंगणे, रमेश वेंगुर्लेकर, राजेश म्हसकर, अजित जंगले, अर्चना जंगले, सानिका सामंत, संतोष सामंत, रमेश वाईरकर, सायली वायंगणकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!