28.1 C
New York
Saturday, April 19, 2025

Buy now

आमदार नितेश राणे यांनी उपळे उपडेवाडीतील ग्रामस्थांची नाराजी केली दूर

लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर घातला होता बहिष्कार

उपडेवाडी आमदार नितेश राणेंच्या राहणार पाठीशी : ग्रामस्थांनी दिला शब्द

वैभववाडी : उपळे उपडेवाडी येथील ग्रामस्थांची नाराजी दूर करण्यात आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane ) यांना यश आले आहे. काही कारणामुळे वाडीतील ग्रामस्थ नाराज होते. लोकसभे दरम्यान यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. परंतु आमदार नितेश राणे यांनी उपळे (Upale ) गावात जाऊन या सर्व ग्रामस्थांची नाराजी दूर केली आहे. त्यामुळे उपडेवाडीतील संपूर्ण ग्रामस्थ हे प्रचारात सहभागी झाले आहेत.

उपडेवाडीतील ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला होता. आज आमदार नितेश राणे (MAL Nitesh Rane ) यांनी पार पडलेल्या बैठकीत समस्या, प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन दिले. त्यामुळे ग्रामस्थांनी या निवडणुकीत शंभर टक्के मतदान करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!