-6.4 C
New York
Monday, February 9, 2026

Buy now

मुख्यमंत्र्यांवरच आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा नोंद करा!

शिवसेना कुडाळ तालुकप्रमुख राजन नाईक यांची मागणी

कुडाळ, प्रतिनिधी : शिंदे गटांमध्ये निलेश राणे यांच्या प्रवेशासाठी खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुडाळमध्ये येत आहेत. कुडाळ तालुक्यातील लाईट पोल आणि शासकीय मालमत्तेवर बॅनर लावून आचार संहितेचा भंग केला असल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी कुडाळ तालुका शिवसेनाप्रमुख राजन नाईक यांनी कुडाळ उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूसे यांच्याकडे केली आहे.

यावेळी राजन नाईक यांनी सांगितले की, निलेश राणे हे शिंदे गटात प्रवेश करीत असल्याने पाट ते कुडाळ आणि कुडाळ शहरात शासकीय मालमत्तेवर बेकायदेशीर बॅनर लावलेले असून आचार संहितेचा भंग केला आहे. तसेच लाडक्या बहिणीना गर्दीसाठी बचतगटांना सक्ती केलेली आहे. हा पण आचार संहितेचा गुन्हा नोंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करावा अशी मागणी नाईक यांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!