लोकसभा निवडणुकीत वाईट वागणूक मिळाल्याचा आरोप….
सावंतवाडी : महायुतीत असलो तरी राष्ट्रवादीला फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात गृहीत धरले जात आहे. निवडणुका पुरते फक्त मदत मागितली जाते. लोकसभा निवडणुकीत वाईट वागणूक देण्यात आली. त्यामुळे जोपर्यंत ठोस आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही, असा इशारा आज येथे झालेल्या सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादीच्या बैठकीत देण्यात आला. दरम्यान याबाबत वरिष्ठांनी चर्चा करून स्थानिक माहितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात. तिडकीने काम करून सुद्धा कोणी दखल घेत नसेल तर आमचा मार्ग मोकळा आहे, अशी भूमिका यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून मांडण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज येथील कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष एम.डी. सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदयनराव भोसले, दोडामार्ग तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर, प्रदेश चिटणीस सुरेश गवस, सत्यजित देशमुख, रफिक खान, अशोक पवार, संदीप राणे, विजय कदम, रामचंद्र सावंत, रिद्धी परब, रंजना निर्मल, विलास पावसकर, दीपक देसाई, गुरुदत्त कामत, मेघेंद्र देसाई, प्रकाश गावडे, सतीश नाईक, सुशील चमनकर, गजानन कुंभार, चंद्रशेखर मांजरेकर,ऑगस्तीन फर्नांडिस, प्रमोद राऊळ, सतीश नाईक, संतोष राऊळ, सोहम परब, प्रमोद राऊळ, धर्माजी गावडे, सचिन कोंडीये आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.