वेंगुर्ले येथे ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून जल्लोषी स्वागत…
वेंगुर्ले : गेली पंधरा वर्षे लोकांची दिशाभूल करणाऱ्या दीपक केसरकर यांना आता घरी बसवायचे आहे. त्यासाठी मला साथ द्या, असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी वेंगुर्ले येथे केले. दरम्यान शिवसेनेत परतल्याचा आनंद आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या ठिकाणी संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. तेली यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वेंगुर्ले त्यांचा शिवसैनिकांच्या माध्यमातून जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी ते उपस्थितांना बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, महिला जिल्हा संघटिका सुकन्या नरसुले, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, प्रकाश गडेकर,पंकज शिरसाट व अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.