कुडाळ : काल जांभवडे येथे भाजपा कार्यकर्त्यांचा उबाठा प्रवेश वगेरे बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र जांभवडे गावातील भाजपा लक्ष अभेद्य असून पक्षातील कुठलाही कार्यकर्ता उबाठा गटात गेलेला नाही. अशी माहिती माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी दिली आहे. वैभव नाईक यांनी ज्यांचा प्रवेश दाखवला ते उबाठा गटाचेच कार्यकर्ते असून असे प्रकार करून वैभव नाईक हे जनतेची नाही तर स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत. सतत दहावर्ष आमदार राहून वैभव नाईक यांच्यावर अशी केविलवाणी स्थिती येत असेल तर यापेक्षा मोठं दुर्भाग्य नाही. जांभवडे गावासाठी भरगोस विकासनिधी दिला अस वैभव नाईक यांनी म्हटलं मात्र तो कुठला निधी हे त्यांनी जाहीर केलं नाही.
दहावर्षे आमदार असताना त्यांनी कुठला निधी जांभवडे गावासाठी दिला हे एकदा जाहीर करावं. जांभवडे कासारखिंड रस्ता निलेश राणे खासदार असताना पंतप्रधान सडक योजनेतून मंजूर करून पूर्ण करण्यात आला मात्र या रस्त्यावर गेल्या दहावर्षात एक बॅरल डांबरासाठी देखील वैभव नाईक यांनी निधी दिला नाही, आज संपूर्ण रस्ता खड्डेमय असून याला आमदार वैभव नाईक यांचा गेल्या दहावर्षातील निष्क्रिय कारभार जबाबदार आहे अशी टीका लॉरेन्स मान्येकर यांनी केली आहे. चार चार वेळा सोनवडे घाटरस्त्याची खोटी भूमिपूजन करून स्वतःच नाव मातीत घालणाऱ्या वैभव नाईक यांच्याजवळ आता जांभवडे पंचक्रोशीत दुसरा कुठला धंदा शिल्लक न राहिल्याने आता त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश दाखवून आजच मरण उद्यावर ढकलण्याचा खेळ सुरू केला आहे मात्र जांभवडे पंचक्रोशी ही भारतीय जनता पक्षाची मजबूत बाजू असून निलेश राणे यांना तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य हे जांभवडे पंचक्रोशीतुनच मिळेल अशी खात्री लॉरेन्स मान्येकर यांनी दिली आहे.
*आपल्याच कार्यकर्त्यांचे उबाठा गटात प्रवेश दाखवण्याची वैभव नाईक यांच्यावर दुर्दैवी वेळ.*
*निलेश राणे यांना सर्वाधिल मताधिक्य हे आंब्रड मतदारसंघातूनच मिळवुन देऊ – लॉरेन्स मान्येकर.*
काल जांभवडे येथे भाजपा कार्यकर्त्यांचा उबाठा प्रवेश वगेरे बातम्या प्रसिद्ध झाल्या मात्र जांभवडे गावातील भाजपा लक्ष अभेद्य असून पक्षातील कुठलाही कार्यकर्ता उबाठा गटात गेलेला नाही. अशी माहिती माजी जि. प. सदस्य लॉरेन्स मान्येकर यांनी दिली आहे. वैभव नाईक यांनी ज्यांचा प्रवेश दाखवला ते उबाठा गटाचेच कार्यकर्ते असून असे प्रकार करून वैभव नाईक हे जनतेची नाही तर स्वतःचीच फसवणूक करून घेत आहेत. सतत दहावर्ष आमदार राहून वैभव नाईक यांच्यावर अशी केविलवाणी स्थिती येत असेल तर यापेक्षा मोठं दुर्भाग्य नाही. जांभवडे गावासाठी भरगोस विकासनिधी दिला अस वैभव नाईक यांनी म्हटलं मात्र तो कुठला निधी हे त्यांनी जाहीर केलं नाही.
दहावर्षे आमदार असताना त्यांनी कुठला निधी जांभवडे गावासाठी दिला हे एकदा जाहीर करावं. जांभवडे कासारखिंड रस्ता निलेश राणे खासदार असताना पंतप्रधान सडक योजनेतून मंजूर करून पूर्ण करण्यात आला मात्र या रस्त्यावर गेल्या दहावर्षात एक बॅरल डांबरासाठी देखील वैभव नाईक यांनी निधी दिला नाही, आज संपूर्ण रस्ता खड्डेमय असून याला आमदार वैभव नाईक यांचा गेल्या दहावर्षातील निष्क्रिय कारभार जबाबदार आहे अशी टीका लॉरेन्स मान्येकर यांनी केली आहे. चार चार वेळा सोनवडे घाटरस्त्याची खोटी भूमिपूजन करून स्वतःच नाव मातीत घालणाऱ्या वैभव नाईक यांच्याजवळ आता जांभवडे पंचक्रोशीत दुसरा कुठला धंदा शिल्लक न राहिल्याने आता त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश दाखवून आजच मरण उद्यावर ढकलण्याचा खेळ सुरू केला आहे मात्र जांभवडे पंचक्रोशी ही भारतीय जनता पक्षाची मजबूत बाजू असून निलेश राणे यांना तालुक्यातील सर्वाधिक मताधिक्य हे आंब्रड मतदारसंघातूच मिळेल अशी खात्री लॉरेन्स मान्येकर यांनी दिली आहे.