8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

विधानसभा निवडणूकीसाठी कुडाळ-मालवण साठी प्रशासन सज्ज

ऐश्वर्या काळूशे ; मतदारसंघात २७९ मतदान केंद्र, १८ केंद्रात ‘नो नेटवर्क’…   

कुडाळ : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात २३३ ठिकाणी २७९ केंद्रे कार्यान्वित केली जाणार असून एकुण २ लाख १५ हजार ३१० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अशी माहिती कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी दिली. त्या आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे उपस्थित होत्या. निवडणुक आयोगाने १५ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागा करीता विधानसभा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात २६९ कुडाळ विधानसभा मतदार संघात निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबरला जाहीर झाली आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून २३३ ठिकाणी २७९ केंद्रे कार्यान्वित केली जाणार आहेत. त्या सर्व केंद्रामध्ये एकुण २ लाख १५ हजार ३१० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरूष १ लाख ७ हजार १२१ तर स्त्री मतदारांची संख्या १ लाख ८ हजार १८८ अशी आहे. विशेष म्हणजे या मतदार संघात एकुण १८ केंद्रे ही नो नेटवर्क असलेली केंद्रे आहेत. त्याठिकाणी प्रशासनाच्या वतीने ‘स्पेशल रनर्स’ ठेवण्यात आले आहेत, असे ही त्या म्हणाल्या. दरम्यान निवडणुक विषय कामकाजासाठी २९ पथके नेमण्यात आलेेली आहेत. या प्रत्येक पथकात १ नोडल, १ सहाय्यक नोडल, ८ ते १० कर्मचारी, ४ ते ५ शिपाई व कोतवाल यांचा सहभाग राहणार आहे. सर्व पथकांमध्ये मिळून ३५० ते ४०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. कुडाळ विधानसभा मतदार संघात सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून कुडाळ तहसिलदार विरसींग वसावे, मालवण तहसिलदार वर्षा झाल्टे व महसुल विभागाचे तहसिलदार शितल जाधव काम पाहणार आहेत. या मतदार संघात नेटवर्क नसलेली कुडाळ ९ व मालवण तालुक्यात ९ अशी १८ केंद्रे आहेत. यामध्ये निरोम, कुडोपी, भाटीवाडी, पोईल, शिरवंडे, डिकवळ, चाफेखोल, महानवाडी, कोळंब, कुसगांव, किनळोस, नारूर, वसोली, चाफेली, पुळास, उपवडे व आंजिवडे या गावांचा समावेश आहे. तरी सुध्दा पोलिस पाटील यांना ‘स्पेशल रनर्स’ म्हणून सज्ज ठेवण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!