28.8 C
New York
Wednesday, June 25, 2025

Buy now

जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या किंजल अदमचे यश!

देवगड : जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेची विद्यार्थीनी कुमारी: किंजल अदम हिने १०० मीटर धावणे क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून तिची दि.१९ ऑक्टोंबर रोजी डेरवण(चिपळूण) येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार अँड अजित गोगटे यांनी कुमारी : किंजल अदम हिला ५०० रूपयाचे प्रोत्साहनपर बक्षीस देऊन तिला सन्मानित करून शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री.सुनील जाधव व क्रीडा शिक्षक श्री.मृत्युंजय मुणगेकर उपस्थित होते.

अजित गोगटे यांनी कुमारी. किंजल अदम हिने राष्ट्रीय स्तरापर्यंत मैदानी क्रीडा स्पर्धेत मजल मारून स्वतःबरोबर शाळेचे नावलौकिक वाढवावे अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. तिला क्रीडा शिक्षक सौ.समीरा राऊत, श्रीम.संजीवनी जाधव, श्री. मृत्युंजय मुणगेकर, श्री. पराग हिरणाईक, श्री.मोहन सनगाळे यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या अभिनंदनीय यशाबद्दल सचिव श्री.प्रवीण जोग, शाळा समिती अध्यक्ष श्री. प्रसाद मोंडकर, मुख्याध्यापक श्री.संजय गोगटे, सर्व शिक्षक – शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!