8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही फिरत्या वाहनावर कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपक वापरण्यास निर्बंध…!

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) | मयूर ठाकूर : निवडणुकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जिवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा घालू ठेवण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (द 3) मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर खालील प्रमाणे निर्बंध घालण्यात आले आहेत.

ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. आहेत. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्यावापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहीती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.

हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (दिनांक. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत) अंमलात राहतील.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!