24.5 C
New York
Wednesday, July 2, 2025

Buy now

काँग्रेसच्या कोठ्यावर नाचानाऱ्यांनी दुसऱ्यांवर बोलू नये 

आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत ना सूनालवले

संजय राऊत च्या स्वप्नात पण हिंदूंचा गब्बर येतो, टीकेला दिले उत्तर

कणकवली : काँग्रेसच्या कोठ्यावर नाचानाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करू नये.स्वतःच्या बुडाखाली काय आग लागली आहे ते आधी पहावे. दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या कोठ्यावर तुम्हाला मुजरे करायला लागताय आणि काँग्रेसवाले तरीही ढुंकून सुद्धा तुमच्याकडे बघत नाहीये.एका एका उमेदवारी साठी तुम्हाला नाक रगडायला लागते.अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी उबाठा व संजय राऊत यांच्यावर केली.

काँग्रेसवाल्यानी अक्षरशा तुमच्या नाकातून रक्त काढलेला आहे. तुम्हाला किती उमेदवारी च्या सीट द्यायच्या कशा सीट द्यायच्या ह्याच्यावर जे काय काँग्रेस वाले तुमच्यासमोर डोळे वटारून दाखवत आहेत आणि त्याच्या समोर जे तुमची काय चालत नाहीये ना त्या संदर्भात पहिला आपल थोबाड उघड आणि मग अन्य लोकांवर टीका टिपणी करण्याची हिंमत कर असे संजय राऊत यांना सुनावले. त्याग आणि उद्धव ठाकरे हे समीकरण कधीच नाही. त्यागाची महत्व संजय राजाराम राऊत ला समजणार नाही.हिंदुत्व हया विषयावर तडजोड करण्यापलीकडे ह्यांनी काही केल नाही . हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी जो काही त्याग केला आहे तॊ ह्याच्या सारख्या तीनपाट माणसाला समजणार नाही .महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक कॉन्ट्रॅक स्वतःच्या कुटुंबाच्या नावावर ठेवणाऱ्या भ्रष्ठाचारी संजय राऊत माणसाला त्याग काय असतो ते कळणार नाही.

संजय राऊत च्या स्वप्नात पण हिंदूंचा गब्बर येतो,म्हणून त्याची आई बोलते झोप नाय तर हिंदूचा गब्बर येईल.असा टोला लगावला.ह्याच्या सारख्या औरंग्याच्या नाजायज औलाद्यांकडून आम्हाला हिंदुत्वाचे प्रमाणपत्र नकोय. आमचं रक्त भगवं आहे.तुमच्या सारखं हिरवं नाही.अशा शब्दात सुनावले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!