18.9 C
New York
Wednesday, April 30, 2025

Buy now

नडगीवे घाटात ट्रेलर चा अपघात 

अपघातात एक मयत ;एकजण जखमी

खारेपाटण : मुंबई -गोवा महामार्गांवर असलेल्या खारेपाटण हद्दीत नडगीवे बांबरवाडी घाटीत पहाटेच्या वेळी गोवा ते मुंबई असा जात असलेल्या ट्रेलर चा अपघात झाला.नडगीवे बांबरवाडी घाटीत तीव्र वळणावर लोखंडी साहित्याने भरलेला टेलर वरील चालकाचा ताबा सुटल्याने टेलर हा दुभाजक वरून येत मुंबई ते गोवा जाणारा लेनवर येऊन पलटी होऊन अपघात झाला.सदर अपघातामध्ये एकजण जखमी असून त्यास पुढील उपचार करता उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पाठविण्यात आलेले आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक -मुंडे, पोलीस नाईक -माने,खारेपाटण दूरक्षेत्र चे पोलीस अंमलदार -पराग मोहिते यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली व जेसीबीच्या साहाय्याने ने साहित्य बाजूस करून मयत याच्या अंगाची तपासणी केली. मयत हा राज्य- मध्य प्रदेश येथील असल्याचे समजते आहे.अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!