आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात लहान मुलांना दत्तक देऊन त्यांची विक्री करणारी टोळी सक्रिय झाली आहे. गरजू पालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपये हडप केले जातात. सर्रास असे प्रकार जिल्ह्यात निदर्शनास येत आहेत. याची पोलीस चौकशी होऊन योग्य ती कारवाई होणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष मिलिंद धुरी, सचिव विष्णू चव्हाण, सहसचिव ॲड मोहन पाटणेकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष संदीप सुकी, कुडाळ तालुका अध्यक्ष आर के सावंत, सदस्य आनंद कांडरकर, परेश परूळेकर, मनोज तोरस्कर, निसार शेख आदी उपस्थित होते.
दत्तक देणे प्रकरणात कोणतेही कायदेशीर कागदपत्रे केली जात नाही.कालांतराने टोळी पालकांवरच मुले अपहरणाची तक्रार करतात. पालकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. ही टोळी मुले कुठून आणतात ? याचा तपास होणे गरजेचा आहे. व तस्करी करणाऱ्या टोळीला अटक करून गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.