21.6 C
New York
Thursday, May 23, 2024

Buy now

काकावर पुतण्याचा हल्ला | काका जखमी

साकेडी येथील घटना ; गोठ्या लगतचे कुंपण तोडल्‍याने वादंग

कणकवली : जनावरांच्या गोठ्या लगतचे कुंपण तोडल्‍याबाबत विचारणा केल्‍याचा राग आल्‍याने पुतण्याने काकाला मारहाण केली. तालुक्‍यातील साकेडी बोरीचीवाडी येथे सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमी काकावर खासगी रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीच्या घटने नंतर प्रकाश लक्ष्मण दळवी (वय ६६, रा.बोरीचीवाडी साकेडी) यांनी आज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यात म्‍हटले आहे की, सकाळी दहाच्या सुमारास आपल्‍या जनावरांच्या गोठ्याजवळ गेलो असता तेथे आपला भाऊ सदानंद दळवी आणि त्‍याचा मुलगा जितेंद्र दळवी हे कुंपण तोडत असल्‍याचे दिसून आले. कुंपण का तोडता? अशी विचारणा केली असता सदानंद याने येथे रतांबा झाडे लावायची आहेत असे उत्तर दिले. तर जितेंद्र दळवी कोयता घेऊन धावत आला. त्‍याने माझ्या बापाला बोलणारा तू कोण? असे म्‍हणत कोयता उलटा पकडून पायाच्या मांडीवर मारला. तसेच कोयत्‍याची लाकडी मूठ डोक्‍यावर मारली. हा मार वाचविण्याचा प्रयत्‍न करत असताना कोयत्‍याची धारदार बाजू हाताला लागून दुखापत झाली. या मारहाणीनंतर जितेंद्र याने शिवीगाळ करून धमकी दिली, असे प्रकाश दळवी यांनी फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. दळवी यांच्या फिर्यादीनंतर कणकवली पोलिसांनी जितेंद्र दळवी याच्या विरोधात भादंवि ३२४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!