कणकवली : येथे श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव व पालखी परिक्रमा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास बुधवारी १० एप्रिल रोजी प्रारंभ होणार असून या वर्षीचे हे ३० वे वर्षा आहे. सदरचा कार्यक्रम हा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ( ट्रस्ट ) ३११, कलमठ सुतारवाडी, कुंभारवाडी रोड कणकवली येथे होणार आहे. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी १० एप्रिल रोजी सकाळी ९ वा. अभिषेक – गुरुपूजन, सकाळी ११:३० वा. सामुदायिक नामस्मरण व आरती, दु. १२:३० ते ३ वा. महाप्रसाद, दु. २ ते ५ वा. पारायण, सायं. ६ ते ७ वा. गुरुमाऊली महिला भजन मंडळ,कणकवली ( यांचे भजन ), रात्री ७ ते ८ वा. लहान मुलांची दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री ७:३० ते ११ वा. पर्यंत महाप्रसाद, रात्री ८ ते १० वा. पालखी परिक्रमा, नृत्य – भजन ( श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी पालखी मिरवणूक व जयंती उत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच ज्या भक्तांना सामुदायिक पारायण, नामस्मरण व या सेवेत प्रत्यक्ष सहभागी व्हायचे आहे अशा भक्तांना ३० मार्च पूर्वी नोंदणी केली असेल तरच प्रत्यक्ष सहभाग मिळणार आहे.


