सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : जिल्ह्यातील ५११ डी.एड. बेरोजगारांपैकी शासनाच्या पत्रानुसार ३५६ बेरोजगारांना कंत्राटी शिक्षण सेवेत शासन निर्णयानुसार सामावून घेण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले; परंतु उर्वरित ६५ व अन्य सर्वच डी.एड. बेरोजगारांना नजीकच्या काळात सामावून घ्यावे, यादृष्टीने आमचे प्रयत्न राहतील, असे आश्वासन उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी उपोषणकर्त्यांना दिले. सिंधुदुर्गनगरी येथे डी.एड. बेरोजगारांचे सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरूच होते.