सावंतवाडी : दहशतवादाचा बागुलबुवा करणारे दीपक केसरकर आता मात्र नारायण राणेंची चाकरी करताना दिसत आहेत. आपल्या राजकीय फायद्यासाठी कोणासमोरही लोटांगण घालणारा तो प्राणी आहे, अशी टिका आज सोनुर्ली येथे आयोजित खळा बैठकीत खासदार विनायक राऊत यांनी मंत्री दीपक केसरकरांवर केली. दरम्यान काजू बागायतदारांना १३५ रूपयांचा भाव देतो असे सांगून फक्त ठोकमठोकी केली आहे आणि त्यानंतर बोलाविलेल्या बैठकीला ते पळून गेले मात्र आम्ही त्या बागायतदारांना वार्यावर सोडणार नाही, असा ही शब्द त्यांनी दिला. खासदार विनायक राऊत यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ आज सोनुर्ली गावातून केला. यावेळी कुळघरात आयोजित करण्यात आलेल्या खळा बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, अर्चना घारे, शैलेश परब, बाळा गावडे, रुपेश राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी श्री. राऊत यांनी केसरकर व राणेंवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, सिंधुदुर्गात राजकीय दहशतवाद आहे, असे सांगून केसरकरांनी राणेंच्या विरोधात रान पेटवले. परंतू आता राणे चांगले आहे, असे सांगून केसरकर त्यांची सेवा चाकरी करीत आहेत. आपल्या राजकीय फायद्यासाठी ते काहीही करू शकतात. कुठेही लोटांगण घालू शकतात, अशी त्यांनी टिका केली. सोनुर्ली येथे श्री देवी माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर खळा बैठकीत खासदार विनायक राऊत बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडी विधानसभा संपर्क प्रमुख शैलेश परब, जिल्हाप्रमुख संजय पडते, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा अर्चना घारे, समन्वयक बाळा गावडे, महिला संघटक जान्हवी सावंत, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, माजी सभापती रमेश गावकर, बाळा गावकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, उपतालुकाप्रमुख सुनील गावडे, महिला तालुका संघटक भारती कासार, विद्यार्थी संघटक कौस्तुभ गावडे, राजू गावकर, मनोहर गावकर, विनोद ठाकुर, नरेश मोर्ले, संदेश मडुरकर, विनायक गावडे, राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष नितेशा नाईक, मायकल डिसोझा, चंद्रकांत कासार, आबा सावंत, बाळू माळकर, बाळु परब, अशोक परब आदी उपस्थित होते.
यावेळी राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांना सोईस्कर ठरेल असा निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला. सत्यमेव जयते असे देशाचे ब्रिद वाक्य आहे, त्यामुळे सत्याचा विजय होईल आम्ही सर्व जण निष्ठावंत आहोत त्यामुळे विजय आपला आहे. मतदार संघातील सुख दुःखाच्या कार्यक्रमात मी पोहोचलो आहे. प्रवीण भोसले सज्जन व्यक्तीमत्व, आताच्या गद्दार मंत्र्यात ते दिसत नाही. काजू बी हमीभाव नाही. दिपक केसरकर यांनी बैठक बोलावली पण ते आले नाहीत. बागायतदारांना वाऱ्यावर सोडून गेले, काजू बी भाव मिळत नाही म्हणून शेतकरी बागायतदार आंदोलन करत आहेत पण हिंदू धर्मातील लग्न समारंभ महत्त्वाचा आहे. सोन्याचा भाव वाढत आहे. गोरगरीब जनतेला काजू बी विकून सोन्याची दागिने खरेदी करतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गुजरात मधील मोठ्या काजू व्यापाऱ्यांचे भलं केलं त्यामुळे कोकणच्या काजू ला भाव मिळत नाही. गद्दारी व लाचारी मुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. राऊत म्हणाले, कोकण रेल्वेच्या सावंतवाडी स्थानकावर टर्मिनस व्हावे आणि प्रा मधू दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे म्हणून मी मागणी करत आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर देशभरातील गाड्या धावतात त्यामुळे दुपदरीकरण व्हावे. कोकण रेल्वे भारतीय रेल्वे बोर्डात विलीनीकरण झाले पाहिजे. म्हणून मागणी केली त्याला रेल्वेमंत्र्यांनी प्रतिसाद दिला, पण महाराष्ट्रातील तिघाडी सरकार मधील मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री , केंद्रीय मंत्री कोकण रेल्वे विलीनीकरण करण्यासाठी पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने जनतेत मानसन्मान मिळतो, असे राऊत यांनी सांगितले. ते म्हणाले, गद्दार गद्दारच असतो. नारायण राणे भाजप वर सडकून टीका करायचे आणि आता गुणगान करत आहेत. नारायण राणे यांच्या कडे सुक्ष्म लघु उद्योग केंद्रीय मंत्रीपद आहे, पण कोकणासाठी काही केले नाही. नम्रता, विनम्रता ठेवून मी काम केले तर राणे माझ्या वर टीका करतात. राणे यांच्या वर आम्ही जाणूनबुजून टिका करणार नाही पण राणे यांच्या काळात संवेदनशील मतदार केंद्र होते पण आज शांतताप्रिय सुसंस्कृत मतदार संघ बनला आहे हे महत्त्वाचे आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, खासदार विनायक राऊत यांनी दहा वर्षे नेतृत्व केले. विकास साधताना सुसंस्कृत खासदार म्हणून विनायक राऊत यांनी नावलौकिक मिळविला आहे. लोकसभेत प्रा मधू दंडवते यांच्या नंतर विनायक राऊत यांनी ठसा उमटवला आहे. जनतेचे प्रश्न काय सोडवलं ते केसरकर यांना सांगावे लागेल. मोदींनी भरपूर आश्वासन दिली पण काही मिळाले नाही. गद्दारांना हटविले पाहिजे त्यासाठी मतदान करा. मोदी गॅरंटी नको तर विनायक राऊत यांचीच मतदार संघात गॅरंटी चालतेय. सौ घारे म्हणाल्या की, देश वाचवायचा असेल तर गद्दारांना हटविले पाहिजे. अस्मानी संकट सुरू असताना सुलतानी संकट शेतकऱ्यांना सतावत आहे. विनायक राऊत तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्ट्रिक करणार आहेत. कोकणची संस्कृती जोपासणाऱ्या विनायक राऊत यांच्याकडे काम घेऊन जाताना भिती वाटत नाही. गद्दारांना हटविले पाहिजे.देश व संविधान वाचविले पाहिजे. शैलेश परब म्हणाले, खासदार विनायक राऊत विजयी होतील दुसरे पराजीत होतील त्यामुळे दोन हॅट्ट्रिक साधल्या जातील. तुम्हाला दादागिरी कि शांतताप्रिय सुसंस्कृत खासदार पाहिजे. दिपक केसरकर यांनी गद्दारी केली तसेच दहशत दहशत म्हणून रान उठविले त्यांच्या मांडीला मांडी लावून भाषणे ठोकताहेत. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत, समन्वयक बाळा गावडे यांनी विचार मांडले.