थोर- स्त्री पुरुष वेशभूषा -घोषवाक्य पाठांतर कार्यक्रम संपन्न
कणकवली शहरातील अनेक स्कूलचा सहभाग
कणकवली : ट्विंकल स्टार प्ले स्कूल (शिवाजी नगर), कामगार कल्याण, मॉडर्न प्ले स्कूल स्कूल, (रेल्वे स्टेशन) श्री गणेश मॉटेसरी प्ले स्कूल व. शिक्षक वृंद व पालक वर्ग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी ऋत्विक राणे व प्रमुख पाहुणे शिक्षिका मनीषा पाटील या लाभल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा मॅडम तसेच वर्गशिक्षिका स्नेहल राणे व श्रुती राणे या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाची बक्षीसे कै. रमाकांत शंकर राणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात आली व सौ. वांगणकर यांच्याकडून प्रमुख पाहुणे मनिषा पाटील यांच्या हस्ते देण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभुषा साकरुन सर्वांच्या कौतुकाची शाबासकी मिळवली या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन सौ शर्वरी आजगावकर मॅडम यांनी केले व आभारप्रदर्शन शैलजा मुखरे यांनी केले शेवटी धन्यवाद मानून कार्यक्रम संपन्न झाला.