10.6 C
New York
Tuesday, October 15, 2024

Buy now

लैंगिक अत्याचार करून आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी

संशयित युवकास अटक व पोलीस कोठडी

कणकवली : २२ वर्षीय युवतीवर लैंगिक अत्याचार करून, तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी रोहन चंद्रकांत गुरव (३२, पिसेकामते – गावठाणवाडी) याला कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून शनिवारी अटक केली. याला रविवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ ऑ क्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही घटना १७ जून २०२३ रोजी दुपारी १२.३० ते २७ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वा. मुदतीत घडल्याचे पीडित युवतीने फिर्यादित म्हटले आहे.

फिर्यादीनुसार, युवती एका बस स्थानकावर थांबलेली असताना संशयित रोहन तेथे दुचाकीने आला. त्याने युवतीला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले व एका तलावाकडे नेले. तेथे त्याने युवतीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर आपल्याकडील मोबाईलने युवतीचे आक्षेपार्ह फोटोही काढले.

त्यानंतर एका दिवशी युवती एका बाजारपेठेत असताना रोहन याने तिला फोन करून भेटायला बोलवले. युवतीने नकार दिला असता रोहन याने त्याच्याकडील आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर युवती आपल्या कामाच्या ठिकाणी असताना रोहन याने तेथे येऊन सदर युवतीला आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची पुन्हा धमकी देत सोबत येण्यास सांगितले. परिणामी युवतीने घाबरून रोहन याच्यासोबत दुचाकीने गेली. रोहन याने त्या युवतीला यापूर्वी नेले होते, त्याच तलावाकडे नेले आणि पुन्हा लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादित म्हटले आहे.

रोहन युवतीच्या फिर्यादीनुसार संशयित गुरव याच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच रात्री उशिरा रोहन याला राहत्या घरातून अटक केली. रोहन याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. रोहनचा मोबाईल, गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच अधिक तपासासाठी न्यायालयाने संशयिताला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!