8.5 C
New York
Tuesday, December 10, 2024

Buy now

महायुतीतून उमेदवारी दिल्यास केसरकरांचा सावंतवाडीत पराभव – राजन तेलींचा दावा

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडी मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी दिल्यास त्यांचा निश्चितच पराभव होईल, असे जनमत सर्वेक्षणाच्या माध्यमातून उघड झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी भाजपचा उमेदवार देऊन केसरकरांना मुंबईतून निवडणूक लढण्याची संधी द्यावी, अशी मागणी आपण भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे करणार आहे, अशी भूमिका भाजपचे नेते राजन तेली यांनी आज येथे मांडली. दरम्यान वेगवेगळ्या घोषणा करून दीपक केसरकर हे गेली १५ वर्षे मतदारसंघातील लोकांची फसवणूक करत आहेत. प्रत्यक्षात मात्र कोणताही प्रकल्प अथवा मुद्दा त्यांनी पुढे नेलेला नाही. त्यामुळे ते आता घोषणा मंत्री म्हणून पुढे येत आहे, असा ही टोला त्यांनी लगावला.

श्री.तेली यांनी आज यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, स्थानिक आमदार दीपक केसरकर फक्त घोषणा मंत्री झाले आहेत ते अलटून-पालटून घोषणा करतात सध्या ताजला जागा दिली आहे तेथे स्थानिक लोक काही जागा वगळा म्हणून मागणी करत आहेत आणि केसरकर आपला मुद्दा पुढे रेटून नेत आहेत .स्थानिक लोकांना डावलून कोणताही विकास होणार नाही असे असताना केसरकर आपला हेकेखोर पणा कशासाठी करत आहे असा प्रश्न राजन तेली यांनी उपस्थित करून आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना या विषयाची माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत ताज भूमिपूजन बाबत केसरकर यांनी तीन चार वेळा तारखा जाहीर केल्या. मात्र तो कार्यक्रम होऊ शकला नाही. श्री. तेली पुढे म्हणाले,आडाळी येथील एमआयडीसी प्रकल्पाच्या ठिकाणी मंत्रीच उद्योगपतीला घेऊन आलेत असं कधी होत नाही. यामागचं गुपित काय ?असा सवाल तेली यांनी उपस्थित करून दुसऱ्यांना भाषणात विकास होत नाहीत म्हणतात पण केसरकर यांनी गेल्या १५ वर्षात काय केले ते सांगावे. विकासासाठी जो निधी येतो तो जनतेच्या करातून असतो आमदार किंवा मंत्री हे त्यांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे केसरकर यांनी खिशात हात घालून कोणता विकास केला ते सांगावे. ते म्हणाले, राजस्थान मधील कंपनी आली तर लाल कॅटेगिरी चे उद्योग हरित क्षेत्रात कसे येणार? रोजगार कसा मिळणार ? मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असो किंवा अम्युझमेंट पार्क असो मुख्यमंत्री येणार, शुभारंभ करणार अशा घोषणा फक्त दिल्या जात आहे पण केसरकर यांचा एक महिना मात्र कधी उजाडलेला नाही. दरवेळी सरड्याच्या रंगाप्रमाणे पक्ष बदलणारे केसरकर अजून जनतेला किती काळ फसवणार आहेत. आपण स्वयंभू असल्याचे भासवतात मात्र आता त्यांना भाजपची गरज का आहे असा प्रश्न देखील राजन तेली यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, केसरकर यांच्या विरोधात मी शंभर टक्के निवडणुकीत उतरणार आहे. त्यांचा प्रचार करणार नाही.या दोन-तीन दिवसात पक्षाच्या वरिष्ठांची भेट घेऊन भाजपची ताकद कोकणातील सावंतवाडी मतदारसंघात सर्वाधिक असल्याचे पटवून देणार आहे.प्रत्येक पार्टी एक-एक उमेदवार कसा विजयी होईल हे पाहत असते, त्यामुळे हा मतदारसंघ अदलाबदल होऊ शकतो .केसरकर हे मुंबईत काम करत आहेत तेथे पालकमंत्री आहेत त्यांना तेथे उमेदवारी द्यावी आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ भाजपला सोडावा या मागची कारण मिमांसा मी पार्टीच्या वरिष्ठांना पटवून देणार आहे, असे राजन तेली यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!