वेंगुर्ला : क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वेंगुर्ला तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत १७ वर्षाखालील मुले या गटातून सिंधुदूर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विजेतेपद पटकावले. त्यांची मालवण येथे होणा-या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष इर्शाद शेख, संचालक प्रशांत नेरूरकर, सचिव दत्तात्रय परूळेकर, मुख्याध्यापिका सौ.मनीषा डिसोजा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.