18 C
New York
Saturday, April 26, 2025

Buy now

अखेर अपघातस्थळावरून पळून गेलेला कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात

कंटेनरसह चालकाला आणले कणकवली पोलीस ठाण्यात

कणकवली :  मुंबई – गोवा महामार्गावर वागदे गावठणवाडी येथील बिट्टू हॉटेल व चायनीज सेंटर समोर गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर रस्त्याच्या पार्किंग करून ठेवलेल्या कंटेनरला ऍक्टिवा मोटारसायकलची धडक बसून २४ ऑगस्ट रोजी पहाटे च्या सुमारास अपघात झाला होता. या अपघातात मोटार सायकलवरील चालक  साहिल संतोष भगत ( वय २३ वर्षे. रा – विद्यानगर कणकवली ) व ( संकेत नरेंद्र सावंत, वय २४ वर्षे, रा- परबवाडी, कणकवली ) यांचा जागीच मृत्यू झाला होता.

या अपघातानंतर कंटेनर सहीत चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी कणकवली पोलिसांनी धडक कारवाई करत कंटेनरसह त्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

याबाबत वृत्त असे की, अज्ञात कंटेनरचालक हा कंटेनरसह घटनास्थळावरून पळून गेलेला होता. त्या अनुषंगाने कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर कंटेनर चालक व कंटेनरचा गुन्हा घडल्यापासून कणकवली पोलीस ठाण्याचे पथक हे शोध घेत होते. अखेर सीसीटीव्ही कॅमेरे व इतर तांत्रिक तपासातून कंटेनर निष्पन्न करून कणकवली पोलीस ठाण्याचे एक पथक हे मुंबई येथे जाऊन कंटेनरचालक व कंटेनर यांच्याविषयी माहिती घेऊन कंटेनर चालक व कंटेनर ( एमएच ०१ डीआर ३५१३ ) ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यास आणण्यात आला.

यामध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे व पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस शिपाई भूषण सुतार, पोलीस शिपाई सागर जाधव तपासकामी व शोधकार्यात सहभागी झाले होते. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मुंडे करीत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!