सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : संकटी धावणारा आणि नवसाला पावणारा म्हणून ओळख असलेला कुडाळ येथील सिंधुदुर्गच्या राजाचे कणकवली – देवगड – वैभववाडी मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांनी कुडाळ येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत येथील माजी नगराध्यक्ष विनायक राणे, राजू राऊळ, प्रदेश सरचिटणीस बंड्या सावंत, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक विलास कुडाळकर, निलेश तेंडुलकर, स्वरूप वाळके, बाळा पावसकर, विश्वास पांगुळ, आबा धडाम, प्रसन्न गंगावणे, राम बांदेलकर, सुनील बांदेकर, राकेश कांदे, चेतन पडते उपस्थित होते.